|| स्वरूप संप्रदाय ||
llॐ ll
खैरेवाडी येथील समाधी मंदिरातील काकड आरती
वेळ : पहाटे ५.३० वा.
पुंडलीक वरदा हरि विट्ठल l श्री ज्ञानदेव तुकाराम l श्री पंढरीनाथ महाराज की जय l
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय l भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय l
श्री दत्तात्रय महाराज की जय l परम सद्गुरू श्री आबा महाराज की जय l
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मिलिंद महाराज की जय l
श्री तुळजाभवानी माता की जय l
ॐ भगवान् l ॐ भगवान् l ॐ भगवान् l आबा महाराज भगवान् l l
ॐ भगवान् l ॐ भगवान् l ॐ भगवान् l आबा महाराज भगवान् l l
ॐ भगवान् l ॐ भगवान् l ॐ भगवान् l आबा महाराज भगवान् l l
ॐ भगवान् l ॐ भगवान् l ॐ भगवान् l आबा महाराज भगवान् l l
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मिलिंद महाराज की जय l
ll भुपाळी ll
प्रभात झाली आबामहाराजा या हो मम अंतरी , स्वामी या हो मम अंतरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll धृ ll
माझे माझे लोप पावूदे , तुझे तुझे उगवूदे , स्वामी तुझे तुझे उगवूदे ,
कोण असे मी तो मी तो मी, सहजपणे कळू दे,
प्रसनतेची प्रभा सदोदीत झळको वदनावरी , स्वामी झळको वदनावरी,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll १ ll
दृष्टी निवळूदे,तिमिर जाऊदे ,आशीर्वाद हवा , स्वामी आशीर्वाद हवा,
अभ्यासाचा या भजनाचा छंद जडूदे जीवा ,
सुमने – सुमने , अर्पण व्ह्यवी , कृपा करा सत्वरी , स्वामी कृपा करा सत्वरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll २ ll
रामकृष्ण तुम्ही , रामतीर्थ तुम्ही , तुम्ही ज्ञानदेव, स्वामी तुम्ही ज्ञानदेव ,
करुणाकर तुम्ही , कृपावंत तुम्ही ,तुम्ही वासुदेव ,
हरिमाय होवुनी , आम्हा जाणवो , हरिमय नर – नारी , स्वामी हरिमय नर – नारी,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll ३ ll
उदात्त – उंन्नत , पावन मंगल , जीवन हे व्ह्यवे , स्वामी जीवन हे व्ह्यवे ,
सोsहं सोsहं , म्हणता म्हणता , ममत्व संपावे ,
सोsहं फुंकर , भरा बनूद्या , या देहा बासरी , स्वामी या देहा बासरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll ४ ll
जवळ घेऊनी , शिकवा गीता , ओढ अशी लागली , स्वामी ओढ अशी लागली ,
घास सानुले , करुनी भरवा , आम्हा गुरुमाउली ,
राम कृष्ण हरि , राम कृष्ण हरि , जपो सदा वैखरी , स्वामी जपो सदा वैखरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll ५ ll
द्वंद न उरले , दु:ख संपले , अनुभव हा यावा , स्वामी अनुभव हा यावा ,
तिमीर मावळे , गगन उजळे , जाणवूदे गारवा ,
चित्ती वचनी , कृतीत यावी , सहज सुधा माधुरी , स्वामी सहज सुधा माधुरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll ६ ll
स्वागत करतो , सद्गुरू राया , उमलो जीवनी उषा , स्वामी उमलो जीवनी उषा ,
कृपा- प्रसादे , स्वामी आपुल्या , शमूदे सगळी तृषा,
भक्तवृंद हा , प्रसन्न वदने , विनम्र वंदन करी , स्वामी विनम्र वंदन करी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll ७ ll
प्रभात झाली आबा महाराजा या हो मम अंतरी , स्वामी या हो मम अंतरी ,
सो s हं घोषंची घुमत रहावा मानस गाभारी ; रहावा sss मानस गाभारी ll धृ ll
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
रूप पाहता लोचनी , रूप पाहता लोचनी , सुख जाले वो सांजणी sss
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा , तो हा माधव बरवा ,
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा ll धृ ll
बहुत सुकृताची जोडी , बहुत सुकृताची जोडी , म्हणुनी विठ्ठली आवडी sss
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा , तो हा माधव बरवा sss
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा ll धृ ll
सर्व सुखाचे आगरु , सर्व सुखाचे आगरु , बाप रखुमादेविवरु sss
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा , तो हा माधव बरवा ,
तो हा विठ्ठल बरवा , तो हा विठ्ठल बरवा ll धृ ll
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
जय जय राम कृष्ण हरि l जय जय राम कृष्ण हरि l
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी , सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ,
कर कटावरी ठेवोनीया , कर कटावरी ठेवोनीया , sss
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ,
आवडे निरंतर हे चि ध्यान , आवडे निरंतर हे चि ध्यान sss
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ll धृ ll
मकर कुंडले तळपती श्रवणी , मकर कुंडले तळपती श्रवणी ,
कंठी कौस्तुम्भमणी विराजीत , कंठी कौस्तुम्भमणी विराजीत sss
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ,
आवडे निरंतर हे चि ध्यान , आवडे निरंतर हे चि ध्यान sss
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ll १ ll
तुका म्हणे मांझे हे चिं सर्व सुख , तुका म्हणे मांझे हे चिं सर्व सुख ,
पाहीन श्रीमुख आवडीने , पाहीन श्रीमुख आवडीने ,
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ,
आवडे निरंतर हे चि ध्यान , आवडे निरंतर हे चि ध्यान sss
तुळशीहार गळा कांसे पितांबर , तुळशीहार गळा कांसे पितांबर ll २ ll
जय जय विठोबा रखुमाई l जय जय विठोबा रखुमाई l
जय जय विठोबा रखुमाई l जय जय विठोबा रखुमाई l
.......डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज
उभे रहावे
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति , बोध काकडा ज्योति ,
पंचप्राण जीवें , पंचप्राण जीवें – भावें ओवाळू आरती l
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, मान्झ्या रुक्मिनीनाथा ,
माझ्या सद्गुरूनाथा , माझ्या आबामहाराजा sss sss
दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, चरणी ठेविला माथा ll धृ ll
काय महिमा वर्णु आता सांगणे ते किती , आता भोगणे ते किती,आता मागणे ते किती sss
कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या, मुख पाहता जाती sss
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, मान्झ्या रुक्मिनीनाथा ,
माझ्या सद्गुरूनाथा , माझ्या आबामहाराजा sss sss
दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, चरणी ठेविला माथा ll १ ll
राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दो बाही , उभ्या दोन्ही दो बाही ,
मयूर पृच्छ चामरें , मयूर पृच्छ चामरें ढाळीती ठायींच्या ठायी sss
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, मान्झ्या रुक्मिनीनाथा ,
माझ्या सद्गुरूनाथा , माझ्या आबामहाराजा sss sss
दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, चरणी ठेविला माथा ll २ ll
विटेसहीत पाय जीवें – भावें ओवाळू , जीवें – भावें ओवाळू ,
कोटी रवि – शशी , कोटी रवि – शशी दिव्य उगवले हेळू sss
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, मान्झ्या रुक्मिनीनाथा ,
माझ्या सद्गुरूनाथा , माझ्या आबामहाराजा sss sss
दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, चरणी ठेविला माथा ll ३ ll
तुका म्हणे दीप घेवूनी उन्मनीत शोभा, उन्मनीत शोभा,
विटेवरी उभा , विटेवरी उभा दिसे लावण्याचा गाभा sss
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, मान्झ्या रुक्मिनीनाथा ,
माझ्या सद्गुरूनाथा , माझ्या आबामहाराजा sss sss
दोन्ही कर जोडोनी, दोन्ही कर जोडोनी, चरणी ठेविला माथा ll ४ ll
जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l
जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l
जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l जय जय पांडुरंग हरि,जय जय वासुदेव हरि l
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी आबा महाराज की जय l
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मिलिंद महाराज की जय l
.............डॉ. गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज